रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाची आत्महत्या

0

जळगाव ;- बँकेत जात असल्याचे सांगून घरातून गेलेल्या तरुणाने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे पवन बाविस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याने पदवीपर्यंचे शिक्षण घेतले होते. सोमवारी आली आहे. दुपारी त्याने घरच्यांना मी जळगाव येथे बँकेच्या कामानिमित्त जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. त्यानंतर तो कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ येवून त्याने जळगाव ते पाळधी दरम्यान अपलाईनवर खांबा क्रमांक ३०१ / ७ ते ९ दरम्यान, रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पवनच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असूनयाप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.