वादळाचा धुमाकूळ, 2000 हून अधिक मृत्यूची भीती (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

लिबियामध्ये डॅनियल वादळाने कहर घातला आहे. दोन दिवसांत वादळ आणि पुरामुळे  2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होण्याची भीती असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच यात हजारो लोक बेपत्ता आहेत.

https://x.com/MDWLiveFeed/status/1701273078825885938?s=20

लिबियाच्या पूर्वेकडील भागात सर्वाधिक विध्वंस झाला असून वादळ आणि पुराच्या चिखलामुळे बहुमजली इमारतीही कोसळल्या. अशा परिस्थितीत,  लिबियामध्ये सरकारकडून बचाव मोहीम चालवली जात आहे. जिथे बचाव पथकाचे लोक घटनास्थळी पोहोचून लोकांचे प्राण वाचवत आहेत.

https://x.com/ItsKhan_Saba/status/1701397490141110773?s=20

लिबियातील या विध्वंसानंतर पंतप्रधान ओसामा हमद यांनी देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. यासोबतच देशभरात झेंडे अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॅनियल वादळानंतर आलेल्या पुरामुळे डेरना येथे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर शहराला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. वादळामुळे आलेल्या पुरानंतर लिबियातील अनेक शहरांमध्ये घरे आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाल्या आहेत. डॅनियल चक्रीवादळ संपूर्ण प्रदेशात पसरले आणि अनेक किनारी शहरांमधील घरे उद्ध्वस्त केली, दोन जुने धरण फुटल्यानंतर डेरना शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.