राज्यात पोलीस निरीक्षकांची ८०० पदे रिक्त

0

 मुंबई :- विविध सण, उत्सव तसेच निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस निरीक्षकांची राज्यात सुमारे ८०० पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गृहखात्याकडून मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने ही पदे रिक्त आहेत. ३० ते ३५ टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस दलावर या महत्त्वपूर्ण पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे गृह विभागाने ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.

सण, उत्सव, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, गणेशोत्सव, ईद, पोळा, निवडणूक बंदोबस्तासह विविध प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी दहा ते बारा वर्षे सलग सेवा दिल्यानंतर पोलीसनिरीक्षक पदी पदोन्नती दिली जाते. त्यामुळे हे पद केवळ दांडग्या अनुभवातून पदोन्नतीने भरले जाते. राज्यात १ हजार ६९९ पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षकांच्या अधिनस्त विविध शाखांमध्ये पोलीस निरीक्षकांची पदे भरली जातात. राज्यात पोलीस निरीक्षकांची सुमारे ३ हजार ५०० पदे मंजूर आहेत.

मात्र मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरली न गेल्याने पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो सहाय्यक पोलीस निरीक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षकांची तब्बल ८०० पदे जातो. रिक्त असल्याने कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रभारीची जबाबदारी सोपवली जात आहे. ३० ते ३५ टक्के पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस दलावर या महत्त्वपूर्ण वेळीच पदोन्नतीने पदे भर पदांअभावी कामाचा ताण वाढत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. मागील दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक दर्जाची पदे भरण्यासाठी गृहखाते, पोलीस महासंचालक स्तरावरून हालचाली न झाल्यामुळे ही पदे रिक्त असल्याचे बोलले जात आहे.

निवृत्ती, पदोन्नतीने वर्षाला ४०० जागा रिक्त
राज्यात दरवर्षी २०० ते २५० पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त होतात. त्यांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरल्या जातात. वर्षाला सुमारे दोनशे पोलीस निरीक्षकांना पदोन्नती दिली जात होती. पुन्हा ही पदे रिक्त होतात. त्यामुळे ४०० ते ४५० पोलीस निरीक्षकांच्या जागा कमी, अधिक प्रमाणात खाली जातात. या जागा भरणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा विलंब झाला की, रिक्त जागांचा आकडा फुगत जातो.

पोलीस महासंचालक स्तरावरून वेळीच पदोन्नती पदे भरली जात नसल्यामुळे पोलीस निरीक्षक पदावरून उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पदोन्नतीने पदस्थापना दिली जाते. मात्र अनेक पोलीस निरीक्षक पदोन्नतीची वाट पाहत सेवानिवृत्त झाले..

Leave A Reply

Your email address will not be published.