शेतात झाडाला गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

0

धरणगाव ;- धरणगाव तालुक्यातील एका वृध्द शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसून याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. रमेश विश्राम पाटील ( वय -६०) रा. तरडे ता. धरणगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तरडे ता. धरणगाव येथे राहणारे रमेश पाटील हे सकाळी लवकर उठून शेतात वखरणीसाठी गेले होते. वखरणी केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.