धरणगाव ;- जिनिंगमधील हार्ड बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना १६ रोजी संकाळी सवःवा सहा वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, व्यावसायिक प्रतीक राजेश भाटिया यांच्या मालकीची धरणगाव जळगाव रस्त्यावर पिंप्री येथे जोगेश्वरी जिनिंग फॅक्टरी असून १६ रोजी संकाळी सहा वाजेच्या सुमारास कापसाच्या हार्ड बॉक्स मधील मोटारीत शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी कापसावर उडाल्याने ३१५० क्विंटल कप्सपैकी ३० टक्के कापूस जळून खाक झाला असून यात हजारोंचे नुकसान झाले. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि जिभाऊ पाटील करीत आहे.
Trending
- जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
- मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
- गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
- अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
- अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
- पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
- ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
- दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!

