रडवून हसवणे हाच अभिनय – अभिनेते कुणाल मेश्राम

0

जळगाव;- येथील मू.जे.महाविद्यालय (स्वायत्त) आणि कान्ह ललित कला केंद्र, संचलित सहा दिवसीय नाट्य शिबिरात हस्यजत्रा फेम कुणाल मेश्राम यांनी सहावे आणि शेवटचे अभिनय पुष्प गुंफले. यावेळी त्यांनी सांगितले की, रसिक प्रेक्षकांना हसवून रडवणे याची अनुभूती देणे हे अभिनेत्याचे काम आहे. मुळात अभिनेता हा वास्तवतेचे दर्शन करवणारा हवा. त्याच्या वाट्याला आलेली भूमिका ही जगणे म्हणजे नाट्य कला जोपासणे होय. अभिनयातील आरोह, अवरोह, ताल, नाद, चालणे, बोलणे आवाजाचे स्तर आणि आपण ज्या पात्राची भूमिका साकारतोय त्याचे निरीक्षण करून ते आपल्यात समरस करून घेणे यालाच अभिनय असे म्हणतात. लेखकाच्या विचारांची घालमेल जेव्हा आपण रसिक प्रेक्षकांसमोर मांडतो तेव्हा त्या पात्राची अनुभूती आपण त्यांना करून देत असतो. आज प्रत्येक व्यक्ती हा अभिनेता आहे आणि तो या जगाच्या रंगभूमीवर आपला अभिनय साकारतोय असेही त्यांनी सांगितले. समारोपावेळी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, मिलन भांबरे संचालक कान्ह ललित केंद्र, हास्यजत्रा फेम प्रा. हेमंत पाटील, प्रा. वैभव मावळे, प्रा. दिनेश माळी उपस्थित होते. प्रास्ताविक तेजसा सावळे तर आभार सिद्धांत सोनवणे यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

 

विद्यार्थी सध्या ग्लमरच्या अधीन

विद्यार्थी सध्या ग्लमरच्या अधीन झाले असून त्यांनी वाचन सोडलेले आहे. खूप साऱ्या लेखकांनी खूप सुंदर लिखाण केले आहे. मराठी आणि हिंदी साहित्यात अभिनेत्यासाठी खूप सारे शब्द भांडार आहे. ते वाचून त्यावर अमल करणे गरजेचे आहे. जर विद्यार्थी एकाग्र झाला तर आणि त्याने स्वतःच्या शरीरावर काम केले तर उत्तम कलाकार बनू शकतो.

– शशिकांत वडोदकर, सांस्कृतिक समन्वयक, केसीई सोसायटी

या विद्यार्थ्यांची उपस्थिती

कुलश्री कुलकर्णी, हर्षांजली शिंपी, मिली वर्मा, प्रतिक पाटील, अभिषेक चौधरी, समर्थ पाटील, जगदीश गंगावणे, अथर्व गुरबा, निखील मानकरे, ज्योती पाटील, तेजसा सावळे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुमित सोनवणे, यश मराठे, प्रथम तायडे, सिद्धांत सोनवणे, लोकेश मोरे, अनिकेत यशोद, सोनल शिरतुरे, सुयश नेवे, सनी सोनवणे आणि विवेक चव्हाण.

Leave A Reply

Your email address will not be published.