चोपडा : सत्रासेनकडून चोपड्याकडे येणाऱ्या बसमधील राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील लोहावत येथील हनुमान गेनाराम चौधरी (वय २१) याला तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ शहर पोलिसांनी ३ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसांसह अटक केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
.
पिस्टल व १० जिवंत काडतुससह सत्रासेनकडून पोलिसांची बसमधून चोपड्याकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याला सापळा रचत हनुमान चौधरी याला ताब्यात घेतले. हनुमान गेनाराम चौधरी हा ३ गावठी मिळाली होती. त्यावरून चोपडा शहर पोलिसांनी चुंचाळे गावाजवळ बस थांबवून खाली उतरवले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १ लाख ३० हजार किंमतीचे तीन बनावट पिस्टल, १० हजार किंमतीचे १० काडतुसे यासह मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून चोपडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने हे पिस्टल सत्रासेन येथून घेतल्याचे पोलिसांना सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे, पोना संदीप भोई, पोकॉ मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, आत्माराम अहिरे आदींनी केली.