विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढ व्यक्तीचा मृत्यू

0

यावल  चुंचाळे येथील गाव शिवारातील पंचायतीच्या विहिरीत पाय घसरून प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील राहणारे विठ्ठल प्रल्हाद धनगर वय ४९ हे विहीरीत दिनांक १६ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आढळून आला. ते गाव शिवारातील ग्रामपंचायतच्या विहीरीवर पाणी भरत असतांन पाय घसरून पाण्यात बुडून मयत झाल्याचे निष्पन्न झाले असून याबाबत मयताचा पुतण्या किशोर अशोक धनगर यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मयत विठ्ठल धनगर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले असुन , तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. तर, मयत विठ्ठल धनगर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
चुंचाळे ग्रामपंचायतिने गाव शिवारातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायत विहिरीवर तात्काळ लोखंडी जाळी बसून पुढील अनर्थ टाळावे असे गावातील ग्रामस्थ बोलत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.