अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जेष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मनाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदन केले आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर, गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा मोठा पुरस्कार देण्यात आला आहे. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘हम पाच’ या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथूर हे पात्र अजूनही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. सशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते शेंटिमेंटल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत आहेत.

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.