पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी एक महिन्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या दौऱ्याबाबत निश्चिती नाही.

भारतातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असणाऱ्या नगरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी १९ जानेवारीला हजेरी लावली. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली.

सोलापूर दौऱ्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारीत पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीला दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, या दौऱ्याबाबत अद्याप निश्चित नाही. पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींकडून मोठ्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन
भारतातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं. १८ जानेवारीला रे नगर भागात या प्रकल्पाचं उदघाटन झालं. त्याचबरोबर इतर विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.