अश्लील व्हिडीओ डिलीट करण्याच्या नावाखाली वृद्धाला ४३ लाखांत गंडविले

0

जळगाव ;- जळगाव शहरातील एका ६३ वार्षीय वृद्धाचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून तो डिलीट करण्याच्या नावाखाली ४३ लाख ३ हजार रुपयांना गंडविल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, केशव महादेव पोळ (वय-६५, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज करून व्हिडिओ कॉल करीत अश्लील व्हिडिओतयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्यावे लागतील अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली . पोळ यांनी घाबरून त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम दिल्यावरही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी अखेर रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.