महिलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचे विशेष ॲप, आता घाबरण्याची गरज नाही

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महिलांची सुरक्षा सध्या देशातील महत्वाचा मुद्दा आहे. देशात महत्त्वाचा मुद्दा आहे. देशात महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाच्या घटना समोर येत असतात. महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत, हे वेळोवेळी समोर आले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त रात्री उशिरा कामावरून घरी किंवा घरातून कामाच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्या अधिक आहे. परिणामी महिला अत्याचाराची एखादी घटना समोर आली की, त्यावर जातीचे राजकारण, कँडल मार्च आणि न्यायालयाची आंदोलने झाल्याचे पाहायला मिळालं आहे. पण यामुळे अत्याचार थांबतील का ? याच घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या मोबाईल अ‍ॅपमुळे संकटात असलेली कोणतीही महिला ही पोलीस, पालिका किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधून मदत घेऊ शकते. मोबाइल ॲप पोलिस आणि महापालिका यंत्रणेशी जोडले जाणार आहे. महिलांना विविध गुन्हेगारी कृत्ये किंवा कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांशी संबंधीत गुन्हे मोठ्या प्रमाणात नोंदवले जातात. चोरीसाठी महिलांना बळजबरीने मारहाण केल्याच्या घटना घडत आहे. सुरक्षेसोबतच अत्यंत कठीण परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई महापालिकेने मोबाईल ॲप सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेने दिली. मुंबई महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत हे ॲप तयार करण्यात येत आहे. पोलीस, होमगार्ड, सामाजिक संस्था आदींचा समावेश असेल. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.