हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा ; काही ठिकाणी हिमवृष्टी

0

नवी दिल्ली ;- भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. तर काही भागात हिमवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानमध्ये 3 आणि 4 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर काही राज्यांना तुफान गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत रविवारी जोरदार वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील हवामानावर असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वारे ही ताशी 35 किलोमीटरवेगाणे वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.