अपघातात गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव : शेतात मजूरी कामासाठी जात असलेल्या अनिताबाई आनंदा ब्राह्मणे (वय ३५, रा. जळके, ता. जळगाव) या दुचाकीवरुन पडल्याने गंभीर जखमी झाल्या असल्याने  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारीत्यांचा मृत्यू झाला. . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील जळके गावात अनिताबाई आनंदा ब्राह्मणे या वास्तव्यास होत्या. शेतात मजूरी करुन त्या आपल्या संसाराचा गाडा ओढीत होत्या. दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या घरुन शेतात जाण्यासाठी निघाल्या. रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला त्यांनी हात देवून शेतापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. त्यानुसार दुचाकीस्वाराने त्यांना दुचाकीवर बसवून तो वराडगावाच्या दिशेने निघाला. परंतु दुचाकीवरुन तोल गेल्याने अनिताबाई या मागे कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.