पाथरी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव ;- पाथरी येथील शीतल दीपकसिंग पाटील (वय २८) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माहेरच्या मंडळींनी घातापाताचा संशय व्यक्त केला आहे.

जळगाव तालुक्यातील पाथरी येथे शीतल पाटील या विवाहितेचा मृत्यू झाल्याने तिला शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री तिच्या पतीने
माहेरच्यांकडून घातपात केल्याचा आरोप माहेरच्या आरोप मंडळीनी केला. सासरी तिचा छळ केला जात असल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे. मात्र जे म्हणणे असेल तशी तक्रार देण्याविषयी पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मयत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.