दुचाकी झाडावर आदळून पिंप्राळ्यातील प्रौढ ठार 

0

जळगांव;-तालुक्यातील आव्हाणे रस्त्यावरील खेडी फाट्यावर झाडावर आदळल्याने प्रौढ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. भानुदास गोपाळ जाधव (४५, रा. संत मीराबाईनगर, पिंप्राळा परिसर) असे मृताचे नाव आहे.

भानुदास जाधव दुचाकीने कानळद्याकडे निघाले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे रस्त्यावर खेडी फाट्याजवळ नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी झाडावर

आदळली. या अपघातात डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून जाधव यांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्याचे अनिल फेगडे, गुलाब माळी, संजय भालेराव, रामकृष्ण इंगळे यांनी देखील रात्री घटनास्थळी पाहणी केली सीएमओ डॉ. सचिन पाटील यांच्या खबरीवरून तालुक पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रात्री नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.