आमदार मंगेश चव्हाण यांची मतदार संघात भरारी

0

लोकशाही संपादकीय लेख

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कार्याची लक्षवेधी चुणूक दाखवून दिली आहे. आमदारकीच्या अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. चार वर्षांमध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष कोरोना महामारीशी मुकाबला करण्यात गेला. बाकी तीन वर्षात त्यांनी आमदार संघातील विकास कामांचा धडाका सुरू केला. एका गरीब शेतकरी कुटुंबातील वारसा असलेल्या मंगेश चव्हाण यांचे घराणे वारकरी होय. पंढरपूरच्या विठ्ठलावर त्यांची कमालीची श्रद्धा. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत चाळीसगाव मतदार संघातील एकूण १२ हजार जेष्ठ नागरिक बंधू भगिनींना एकादशी वारी स्वखर्चाने करून आणली. या ज्येष्ठ नागरिकांसोबत स्वतः मंगेश चव्हाण सामील होऊन त्यांच्या नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था जातीने स्वतः केली आणि विठ्ठलाच्या दर्शनानंतर सुखरूप प्रत्येकाच्या घरी पोहोचविले. मतदार संघातील सुमारे १० हजार तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी म्हणून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळ्याचा लाभ मिळवून दिला. मतदारसंघातील तरुण वाईट मार्गापासून दूर राहिले पाहिजे, या हेतूने ३१ डिसेंबरच्या रात्री तरुण-तरुणींना एकत्र करून शुद्ध सात्विक दूध पाजण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाळीसगाव मतदार संघातील अनाथ गरीब गरजू विद्यार्थ्यांना १२०० मोफत सायकली वाटपाचा कार्यक्रम करून ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण घेण्यासाठी चार पाच किलोमीटर पायी जावे लागत लागते, त्यांच्या शिक्षणात गतिमानता यावी आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मतदार संघातील अनाथ गरीब गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना एका समारंभात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या अध्यक्षतेखाली सायकल वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार हे उच्चशिक्षाविभूषित अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. सहकार महर्षी कै. रामराव जीभाऊ यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अंतर्गत १२०० विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करण्याचा मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न केला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्याकडे असलेल्या पैशांचा योग्य प्रकारे सदुपयोग करीत आहेत. पैसा अनेकजण कमावतात पण त्यांचा इतरांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी देण्याची दानत लागते. ती दानत आमदार मंगेश चव्हाणांमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष त्यांची धर्मपत्नी प्रतिभाबाई असून त्या फाउंडेशन अंतर्गत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले जातात. अंगणवाडी सेविकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना योग्य ती आर्थिक सहकार्य केले जाते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत मतदारसंघातील जिल्ह्यातील समोर एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. जळगाव जिल्हा दूध संघाचा भ्रष्टाचारा चव्हाट्यावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या पॅनलचे नेतृत्व केले आणि दूध संघात भाजपा शिवसेना प्रणित पॅनलतर्फे विजयी झेंडा रोवला. त्याचीच फलश्रुती म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांना दूध संघाच्या बिनविरोध चेअरमन पदाची धुरा सोपविली. सर्वात तरुण चेअरमन म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाची सूत्रे हाती घेऊन दूध संघाच्या प्रशासनाला चांगलीच गती दिली आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चेअरमन व त्यांचीच सत्ता होती तथापि जिल्हा बँकेच्या चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडणुकीत दोन्ही मंत्र्यांच्या सहकार्याने गनिमी कावा वापरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून चेअरमन पद हिसकावून भाजप सेनेचा ताबा मिळविला. राष्ट्रवादीचे बंडखोर सदस्य संजय मुरलीधर पवार यांचे गळ्यात चेअरमन पदाची तर पारोळ्याचे सेना आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांचे गळ्यात व्हाईस चेअरमन पदाची माळ घालून राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यामुळे जिल्हा भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आमदार मंगेश चव्हाण यांचे स्थान वाढले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे त्यांचेवर होणारा अन्याय अत्याचार दूर झाला पाहिजे म्हणून विजय बाबत शेतकऱ्यांवर अन्याय करणारे वीज महामंडळाच्या कार्यालयावर पिडीत शेतकऱ्यांसह जाऊन संबंधित वीज अभियंत्याला खुर्चीत बांधून ठेवले. शासकीय कामात अडथळा केल्या म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांवर गुन्हा दाखल होऊन १२ दिवस त्यांना जेलमध्ये राहावे लागले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी कठोरातील कठोर लढा देण्याची भावना त्यांनी जेलमधून बाहेर आल्यावर व्यक्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांशी त्यांची असलेली बांधिलकी दिसून येते. त्याचबरोबर आरटीओ मधील भ्रष्टाचाराविरुद्ध केलेले त्यांचे आंदोलन यशस्वी झाले. ट्रकचालकांची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वतः ट्रक ड्रायव्हर बनून प्रत्यक्ष रंगेहात लाज घेणाऱ्यांना पकडण्याची त्यांनी केलेली कारवाई ही भ्रष्टाचारांविरोधात लढण्याची साक्ष देतात. एवढे करून भाजपशी ते एकनिष्ठ आहेत. भाजपने केलेल्या सर्वेत जळगाव जिल्ह्यात जळगाव मतदार संघात भाजपची बाजू इतर मतदारसंघापेक्षा भरभक्कम आहे. त्यामुळे भाजपच्या गुडबुक मध्ये त्यांची प्रतिमा आघाडीवर आहे. एक तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःचे संपर्क दाखवले. ते पाहून कोणीही थक्क होऊ शकतात. समस्या घेऊन आलेल्या मतदार आपल्या समस्यांची निवारण झाल्यानंतर त्यांचे चेहऱ्यावरचे समाधान आनंद मिळते, तीच खरी मंगेश चव्हाण यांची प्रॉपर्टी होय. गिरीश महाजन यांना मंगेश चव्हाण हे आपले आदर्श मानत असले तरी गुरूंपेक्षा चेल्याने भरारी मारली असल्याची कबुली सायकल वाटप समारंभात खुद्द गिरीश महाजन यांनी दिली. तीस वर्षापासून आमदार मंत्री असताना मला जे जमले नाही ते मंगेश चव्हाण यांनी चार वर्षात करून दाखवले, असे म्हणून मंगेश चव्हाण यांचे महाजनांनी तोंड भरून कौतुक केले. मंगेश चव्हाण यांना मिळालेल्या या पावतीची शिदोरी त्यांच्या आगामी काळात उपयोगी पडणारी आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचे भविष्य उज्वल आहे. त्यांच्या भावी वाटचालीस दै. लोकशाहीच्या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.