शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा; काँग्रेसचे निषेध आंदोलन

0

लोकशाही न्युज नेटवर्क

जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार २७ जानेवारी रोजी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, शहराध्यक्ष श्याम पवार, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य हे कापसाचे म्हणून गणले जाते. यामध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन केले जाते. असे असताना देखील केंद्र सरकारने बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणावर कापसाची आयात केली आहे. त्यामुळे देशात असलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामुळे कमी किमतीत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन परदेशातून कापूस आयात केला जात आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.