मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीसांचं मोठं विधान

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्या विरोधकांच्या टीकेला नेहमी जोरदार उत्तर देत असतात. आज देखील त्यांनी मोठं विधान केलं आहे.

आपल्या देशात दोन राष्ट्रपिता (father of the nation) आहेत. मला राजकारण आवडत नाही. मला त्यात रसही नाही. त्यामुळे मी खूप कमी राजकीय गोष्टींवर मत देत असते. माझ्यासाठी आणि देवेंद्रजींसाठी हे चांगल फायद्याचं आहे. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.” असं मोठं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

तसेच अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मी आधी फार शांत आणि लाजरी होते. पण आता मी माझी मतं ठामपणे मांडते. मी खूप जास्त बोलते असे संघात सांगण्यात आले होते. मात्र माझ्या बोलण्याचा फायदा लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेत आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. मी खूप बोलते हे अगदी खरं आहे. मात्र माझा स्वभावच तसा झाला आहे. कोणतीही प्रतिमा तयार करण्यासाठी मी जास्तीचे बोलत नाही. जे २४ तास राजकारणासाठी काम करतात आपला पूर्ण वेळ जनतेसाठी देतात तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मला कोणतेही वक्तव्य करताना कोणाचीही भीती वाटत नाही. कारण मी फक्त माझी आई आणि सासूबाई या दोघींनाच घाबरते. इतर कोणत्याही व्यक्तीची मला भीती वाटत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.