वणी ममदापूर येथे सर्व रोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर संपन्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती; अमरावती जिल्ह्यातील व तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर  येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ संचालित गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय गुरुकुंज आश्रम तसेच वणी ममदापुर ग्रामपंचायतच्या संयुक्त पुढाकाराणे सांस्कृतिक भवन वणी येथे भव्य मधुमेह रुग्ण रक्त तपासणी तसेच सर्व रोगनिदान व मोफत औषध उपचार  शिबिराचे आयोजण करण्यात आले होते. यामध्ये सुमारे १३२ रुग्णाची मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात आला असून १२ मधुमेह रुग्णांची नोंद करण्यात आली.

शिबिराला सकाळी ९ वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली. या प्रसंगी उद्घाटक म्हणून  सरपंच मुकुंद पुनसे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा पंचायत समितीच्या सदस्या सौ.रोशनी पूनसे तसेच पोलीस पाटील प्रशांत गोर , उपसरपंच रंजना ढोक , ग्रामसेवक प्रेमलता डबाळे, उपस्थित होते.

या शिबिराला तज्ञ डॉक्टर सुरेश पूनसे , डॉ. लक्ष्मीकांत वायमेह , डॉ.हर्षवर्धन कांडलकर , टेक्निशियन म्हणून रामभाऊ पेंदाम , सिद्धता कपाट , पल्लवी चींचीलकर , राणी इपावार , मंगेश काळे उपस्थित होते . तर शिबिराच्या यशस्वीते करिता आशा सेविका रंजना लवनकर , अंगणवाडी सेविका ज्योती मसलदी , अनुसया बांबल ,लक्ष्मी मसलदी , गजानन डांगे , दिनेश राऊत , विलास मसलदी , स्वप्नील टेकाडे , राधेश्याम महात्मे , सुशील शिरपुरकर यांनी परीश्रम केले.

Leave A Reply

Your email address will not be published.