नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक ‘होळी रंगपंचमी उत्सव’ साजरा करा :- वेदांत मुंदाने

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती ;नागरिकांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याच्या होणार अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन बजरंग सेना अमरावति जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने यांनी केले आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी व धुलीवंदन उत्सव’  कोव्हिड-१९ चे प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन देखील केले आहे

दिवसेंदिवस पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेवून नागरिकांनी वृक्षतोड टाळावी तसेच धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे.

त्याचबरोबर बेसावधपणे केमीकल युक्त रंगाचे फुगे अथवा पिचकारी तील रंग डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून होळीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करून आणी कोव्हिड-१९ प्रतिबंधक मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत अत्यंत साधा पद्धतीने ‘होळी उत्सव’  साजरा करण्याचे आवाहन बंजरंग सेनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.