स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार? राजु शेट्टींचे संकेत!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार  यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द माजी खासदार राजू शेट्टी  यांनी दिले आहेत. 24 मार्चला अमरावतीच्या हिवरखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रीय नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनीच केलाय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीत  राहायचं की नाही? याबाबतही या मेळाव्यात निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे.

भुयार यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते आणि तत्कालीन कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करत स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार विजयी झाले होते. त्यावेळी संपूर्ण राज्यात त्यांची जोरदार चर्चा झाली होती.

मात्र, आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या या एकमेव आमदारावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कारण, आमदार भुयार हे पक्षात सक्रीय नसल्याचा आरोप खु्द्द शेट्टी यांनीच केलाय. आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. अशावेळी 24 मार्चला   महत्वाचच नीर्णय ठरणार आहे.

पोस्टरवरुन भुयार यांचे नाव गायब

देवेंद्र भुयार हे निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे 24 मार्च रोजी हिवरखेड इथं होणाऱ्या मेळाव्याच्या पोस्टरवरुन भुयार यांचं नाव नसल्याचंही पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांना या मेळाव्याचं निमंत्रण नसल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय.

स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

दुसरीकडे राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात सातत्याने हल्ला चढवत आहेत. वीज कनेक्शन तोडणी, दिवसा वीज, शेतकरी आत्महत्या अशा मुद्द्यांवरुन राजू शेट्टी सरकार विरोधात रस्त्यावरही उतरताना दिसत आहेत.

अशावेळी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 5 एप्रिलला कोल्हापुरात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत त्याबाबतचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.