भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविण्यासाठी मोदींना पंतप्रधान करा -अमित शहा

0

जळगाव ;-येणारी निवडणूक हि भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविणारी निवडणूक असून हि २०४७ मध्ये मंचावरील लोक कमी राहतील मात्र समोर बसलेले युवक हे राहतील . यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार असतील . आपले मत अशा पक्षाला द्या जो पक्ष भारताला विश्व्गुरु बनवू शकेल त्यालाच मत देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सागर पार्क मैदानावर आयोजित भाजपच्या युवा संमेलन मध्ये आयोजित सभेत केले.

गृहमंत्री अमित शहा तरुणाईला संम्बोधित करताना म्हणाले कि, , हि युवकांसाठी होणारी निवडणूक आहे. आपल्याला घराणे शाही असणारे पक्ष चालतील का ? सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांना आपल्या मुलाला पंतप्रधान बनवायचे आहे,उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यामंत्री बनवायचे आहे. तर शरद पवार यांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता दीदी यांना भाच्याला मुख्यामंत्री बनवायचे आहे अशी टीका करून आपल्यासाठी काय आहे असा सवाल करून आपल्यासाठी नरेंद्र मोदी आहेत.

सोनिया गांधी मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात बॉम्ब हल्ले होत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात स्ट्राईक करून असे दहशतवादी हालले थांबविले . नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटविले . त्यावेळी राहुल गांधी यांनी काश्मिरात खुनाच्या नद्या वाहतील कलम हटवू नये अशी अंगणी केली होती मात्र असे काही झाले नाही. आज भारताची अर्थ व्यवस्था १० वर्षांत नरेंद्र मोदी यांनी ५ व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणली असून येत्या पाच वर्षात जगातील तिसरी अर्थव्यवस्था आणणार आहेत. या देशाचे नेते नरेंद्र मोदी आहेत. देशाचा पंतप्रधान बनवितांना आपण बायोडाटा बघाल कि नाही बघाल . आपल्याला नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान म्हणून कुणी मिळणार नाही . देशात विविध विकासकामे झाली आहेत. १३० करोड लोकांना कोरोना मुक्त करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले असून १०० देशाना कोरोनाची लस पुरविली आहे.

महाराष्ट्रात तीन चाकी असलेली ऑटो रिक्षा चालते तिचे नाव महाविकास आघाडी आहे. हि ऑटो रिक्षा असून तिची चाके पंक्चर झाली असून हि पंक्चर झालेली आघाडी महाराष्ट्राला विकास देऊ शकत नाही अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली . देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास होईल .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.