अमळनेरात धडक कारवाई, गावठी हातभट्टीवर छापा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीवर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतः धडक कारवाई केली असून १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अमळनेर परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट पाहता ४ ठिकाणी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, रवी पाटील, मिलिंद बोरसे, घनश्याम पवार यांच्यासह इतरांनी रविवारी १० डिसेंबर रेाजी छापा टाकून सुमारे २ हजार लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि १५७ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १ लाख १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला नष्ट करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.