खुशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली होती. म्हणून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव एकदिवसात प्रचंड घसरल्याने सराफा बाजारात विक्री वाढल्याचे चित्र आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61595 रुपयांवर उघडला. तर आदल्या दिवशी तो 62415 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 820 रुपयांनी घसरला.

आज चांदीचा भाव 71688 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवशी चांदी 73711 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा दर 2023 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह उघडला. चांदी 5246 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे.

जळगाव येथील सराफ व्यापारांनी दिलेली माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 61,520 रुपये आहे. तर चांदीचा दर 72,070 रुपये आहे. म्हणजेच सोन्याचा दरात 210 रुपयांची तर चांदीच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.