बिना ओव्हनचा सोपा ब्राऊनी केक

0

खाद्यसंस्कृती विशेष

केक म्हटलं म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. आज आपण बिना ओव्हनचा सर्वात सोपा ब्राऊनी केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

साहित्य: 

दिड कप मैदा

१०० ग्रँ. कंपाऊन्ड डार्क चॉकलेट

१/२ कप दुध

१ चमचा बेकिंग पावडर

१/२ चमचा बेकिंग सोडा

५ चमचे गुलाब जामुनचा उरलेला पाक

स्प्रिंकल टॉपिंग

 

कृती:

१. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.

२. डबल बॉयलरमध्ये चॉकलेट मेल्ट करुन घ्या.

३. मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये तीन ते चार पोर्शनमध्ये मैदा घालून मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे.

४. किंवा बिटरने चांगले बीट करून घ्यावे.

५. आता त्यामध्ये गुलाब जामचा पाक व आवश्यकतेनुसार दुध घाला व मिश्रण फेटून घ्या.

६. केक टिनला बटर लावुन मैदा डस्ट करुन मिश्रण त्यात ओता.

७. कुकरमध्ये मीठ घालुन कुकर प्रिहीट केल्यानंतर टिन त्यात ठेवा.

८. ओव्हन असेल तर केक २५ मिनीटे १८० मिडीयम आचवर बेक करा.

९. बेक झाल्यावर केकचे पिस कट करून त्यावर टॉपिंग स्प्रिंकल करा.

 

टिप्स:

पाक नसेल तर साखरेचा पाक किवां पिठी साखर घालु शकता.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.