कुत्रे आडवे आल्याने अमळनेर येथे चारचाकीचा अपघात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील प्रशांत कैलास वायकर हे चारचाकी ह्युंडाई एक्सेंटने (एमएच १९ सीएफ ९२९९) मांडळ मार्गे सोनगिरकडे जात असतांना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वावडे येथील पेट्रोल पंपाच्या पुढे मांडळ रस्त्यावर अचानक कुत्रे समोर आल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. चारचाकी चारीत उतरून पलटी झाल्याने गाडीचे नुकसान झाले व प्रशांत वायकर यांना मुकामार लागला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना भरत ईशी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.