Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लग्नाच्या ७व्याच दिवशी प्रियकरासोबत पळाली नववधू, प्रियकराने केले असं काही…
    गुन्हे वार्ता

    लग्नाच्या ७व्याच दिवशी प्रियकरासोबत पळाली नववधू, प्रियकराने केले असं काही…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला दुसरा काही सुचतच नाही. असंही म्हणतात. पण त्याच प्रेमापायी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पहात नसेल, तर याला खरंच प्रेम म्हणायचं का ? हाच प्रश्न पडू शकेल अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात घडली आहे. तेथे एक नववधू लग्नाच्या अवघ्या आठवड्याभरातच तिच्या प्रियकरासह पळून गेली.

    धक्कादायक गोष्ट म्हणजे पळून जातांना तिच्या प्रियकराने त्या तरुणीच्या वडिलांना कारने चिरडून त्यांची हत्या केली. बिरभूम येथील बोलपूरमधील यज्ञनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुद्दुस शेखची मुलगी कुतबा खातून हिचे त्याच गावातील गजू शेख याच्याशी संबंध होते. पण कुद्दुस यांना त्या दोघांचं नातं मान्य नव्हतं, म्हणूनच त्याने त्याच्या मुलीचं लग्न दुसऱ्या इसमाशी लावून दिल. पण लग्नानंतर ७ दिवसांनी कुतबा ही एका विधीसाठी तिच्या पतीसह माहेरी आली होती. मात्र तेवढा पूर्ण काळ ती गजू शेखसोबत संपर्कातच होती. कुतबा घरी येताच गजू हादेखील कार घेऊन तिथे पोहोचला. त्यानंतर त्या दोघांनीही कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

    किडनॅपिंग आणि खुनाचा गुन्हा
    मात्र आपली लेक गजूसोबत पळून जात असल्याचे दिसताच तिचे वडील कुद्दुस हे त्यांच्या कार अडवण्यासाठी समोर जाऊन उभे राहिले. पण त्यांनी गाडी थांबलीच नाही. गजूने गाडी थेट त्यांच्या अंगावर चालवली आणि त्यांना चरडून तो पुढे गेला. यामुळे गंभीर जखमी झालेला कुद्दुस यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुद्दुस शेख यांच्या कुटुंबियांनी गजू याच्यावर किडनॅपिंग आणि खुनाचा आरोप लावत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

    #crime Newly Wedded Bride Eloped With Boyfriend 7 Days After Marriage
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif