नववर्षाचे स्वागत पावसाच्या सरींनी..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

सध्या थंडीचे दिवस असून त्यात आता पाऊस पडणार आहे. म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल, त्यामुळे थंडी अन् पाऊस असे चित्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही वार्‍याची गती वाढली आहे. त्यामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने 30 डिसेंबर ते 2 जानेवारी असे चार दिवस हलका ते मध्यम पाऊस राज्याच्या विविध भागात होऊ शकतो. विशेषतः खान्देशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

मंगळवारी राज्यातील नगर, जळगाव व पुणे या शहरांचा पारा सर्वात कमी होता. नगर 10.3, जळगाव 11.9, तर पुणे 12.3 अंशावर होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 12 ते 13 अंशावर होते. महाबळेश्वरचे किमान तापमान ढगाळ वातावरणामुळे 16 अंशावर गेले होते.

नगर 10.3, जळगाव 11.9, पुणे 12.3, कोल्हापूर 17.1, महाबळेश्वर 16.2, मालेगाव 13.6, नाशिक 12.6, सांगली 15.2, सातारा 14.2, धाराशिव 14, छत्रपती संभाजीनगर 12.6, परभणी 13.2, नांदेड 14.2, बीड 13.5, अकोला 14.1, अमरावती 14.3, चंद्रपूर 12, गोंदिया 11.4, नागपूर 14.2, वर्धा 14, यवतमाळ 12.5.

 

Leave A Reply

Your email address will not be published.