अमळनेरात साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0

अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा घेताना दिले.

२ ते ५ फेब्रुवारी दरम्यान अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात अ भा मराठी साहित्य संमेलन होत असून त्यासंदर्भात जागा पाहणी व नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमळनेरात आले होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , व्हॉ चेअरमन प्रदीप अग्रवाल ,संचालक योगेश मुंदडा , नीरज अग्रवाल , हरी भिका वाणी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी , प्राचार्य डॉ ए बी जैन, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे , अभियंता हेमंत महाजन यांच्यासह मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य हजर होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की भोजन , प्रत्येक इव्हेंट साठी समिती नेमून घ्या , साहित्यिकांना राहण्यासाठी टेंट सिटी उभारता येईल का याविषयी अधिकाऱ्यांशि चर्चा करा , टॉयलेट ची व्यवस्था आहे का याची पडताळणी करा. यावेळी संचालक नीरज अग्रवाल यांनी प्रताप महाविद्यालयात पाण्याची अडचण आहे असे सांगितले. तसेच पाण्याचा निचरा करण्याची सुविधा देखीलनाही असेही सांगण्यात आले. यावेळी प्रसाद यांनी कुठल्या निधीतून सुविधा करता येतील याविषयी दोन तीन पर्याय सांगितले. संमेलन उत्तम दर्जाचे होण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन देखील केले. सर्व आमदारांना भेटा आणि त्यांच्याकडून निधी घ्या असेही आवाहन केले. नगरपालिकेने समेलनापूर्वी शहराचे सुशोभीकरण व स्वच्छता करावी असेही सूचित केले. संमेलनात निवडणूक मार्गदर्शन , नवमतदार नोंदणी यासाठी स्वतंत्र स्टॉल असेल. पार्किंसाठी स्वतंत्र व्यवस्था करा आणि व्हीआयपी पाहुणे तसेच सामान्य रसिक यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था करावी , गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग असावेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जागेचा ले आऊट तयार करा. टेंट सिटीसाठी प्रायोजक शोधा असेही आवाहन केले. यावेळी जितेंद्र देशमुख , माधुरी पाटील , वसुंधरा लांडगे , मराठी विभाग प्रमुख प्रा रमेश माने , प्रा शिला पाटील , भैया मगर , संदीप घोरपडे ,नरेंद्र निकुंभ , रमेश पवार ,अमोघ जोशी हजर होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.