मराठा समाजाचा इशारा, उपमुख्यमंत्री कार्तिकी पूजेसाठी आल्यास त्यांना काळं फासू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षण मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी जाळण्यात मनोज जरांगे परील यांनी पुन्हा उवषणाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाकेबंदी सुरु केली आहे. राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती. राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनाही मराठा समाजाकडून इशारा देण्यात आला आहे. अशातच मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या महापूजेसही मराठा समाजाने विरोध केला आहे.

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सर्वसामान्य वारकऱ्यांच्या हस्ते करावी तसेच मंत्र्याच्या हस्ते महापूजा होऊ नये, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना पंढरपूर शहरात बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी मंत्री बंदी झुगारून आले तर, त्याला काळे फासले जाईल असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकीची शासकीय महापूजा होईल की नाही यावर प्रशचिन्ह कायम आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.