धक्कादायक; प्रसिद्ध कलादिग्दर्शक सबू प्रवदास यांच अपघाती निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध कला दिग्दर्शन आणि ग्राफिक डिझायनर सबू प्रवदास यांचं निधन झालय. ते ७० वर्षांचे होते. गेल्या दिवसांपासून ते जीवनाशी झुंज देत होते. पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी त्यांचा भीषण अपघात झाला होता. काल शुक्रवार पहाटे त्यांना कार धडक दिली होती. त्यामुळे तिरुवअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केरळीयम कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात तिरुअनंतपुरम येथे सबू आले होते. त्यावेळी रस्ता ओलांडतांना गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे तिरुवअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

प्रसिद्ध प्रवदा स्टुडिओचे मालक दिवंगत प्रवदा सुकुमारन यांचे ते सुपुत्र. टायगर सलीम या चित्रपटाद्वारे त्यांनी मनोरंजन विश्वात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, फिल्म अकादमी चित्रपट महोत्सवासाठी पोस्टर आणि लोगोसह त्यांनी अनेक उल्लेखनीय डिझाइन्स तयार केल्या आहेत. त्यांनी दोन कादंबऱ्या आणि ‘सिनेमायुदे चरित्रपुस्तकम’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.