रश्मीका नंतर आता ‘आलिया भट्ट’ ही डीपफेकच्या जाळ्यात, व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड अभिनेत्रींनवर सध्या ‘डीपफेक’ व्हिडिओच संकट आहे. अभिनेत्री मंदाना, काजोल, कतरीना कैफ, यांसारख्या अनेक अभिनेत्रींनंतर आलिया भट्ट देखील ‘डीपफेक’च्या जाळ्यात अडकली आहे. आलीया हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओमध्ये एका मुलीच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट् हिच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आलिया भट्ट हिला नको त्या अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ एडिट केल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपासून रश्मिका हिचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर अनेक सेलिब्रिटींनी संताप देखील व्यक्त केला. एवढाच नाही तर, दिल्ली पोलिसांच्या हाती याप्रकरणी पुरावे सापडले असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय गुन्हेगारांना अटक होईल अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.