मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अकोल्यामधून (Akola) एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रिंटींग प्रेस (Printing press) चालवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्या (Journalist Suicide ) केली. विशेष म्हणजे सुसाईड नोटमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Ekanth shinde) मला मृत्यूनंतर न्याय द्यावा अशी मागणीही आत्महत्या करणाऱ्या पत्रकाराने केली आहे. तसंच आठ लोकांमुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये (Suicide note) उल्लेख केला आहे.

अकोला शहरातल्या अकोट फाईल परिसरात राहणारे प्रभाकर गंगाराव विरघट (Prabhakar Virghat) हे पत्रकार असून प्रिंटींग प्रेस चालवायचे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असून आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. पण 10 ऑगस्टला मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री प्रभाकर विरघट यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्टला शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता वडिलांन कडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले. त्यावेळी वडिलांनी गळफास घेतल्याचे निदर्शनात आले. वडिलांनी आत्महत्या केल्याचं पाहून मुलाला मोठा धक्काच बसला.

खिशात सापडल्या 3 सुसाईड नोट

यानंतर अकोट फाईल पोलिसांना विरघट यांच्या मुलाने याबाबतची माहिती दिली. अकोट पोलिसांनी पंचनामा केला असता पत्रकार प्रभाकर विरघट यांच्या खिशात तीन चिठ्या सापडल्या. एका चिठ्ठीत प्रिंटींग प्रेसमध्ये फसगत केली आणि विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख आहे.

दुसऱ्या चिठ्ठीत शहरातल्या कौलखेड येथील शिवशक्ती प्रिंटींग प्रेस मधील व्यवहारात 1988 मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजीया, मोतीलालजी कनोजीया यांनी फसगत केली, विश्वासघात केला आर्थिक अडचणीत ठेवले, असा आरोप कऱण्यात आला आहे. आपल्याला गुन्हेगार केले म्हणून आत्महत्या करीत आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

तर तिसऱ्या चिठ्ठीत मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मृत्यूनंतर न्याय द्यावा. आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करीत आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आयुष्य संपवलंय. तसंच ख्रिश्चन कॉलनी येथे राहणारे प्रेस कामगार सुशीर वरघट याच्याकडून माहिती घ्यावी की, प्रेसमध्ये बसणारे आंबेडकरी चळवळीतील कोण कोण होते ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करावा, असंही म्हटलंय. तर जेष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार अकोट फाईल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास अकोट फाईल पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.