चाळीसगाव नगरपालिका आवारात ऐतिहासिक “तिरंगा ध्वजारोहण”

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय स्वातंत्र्याच्या (Swatantracha Amrut Mahotsav) ७५व्या वर्धापनदिनानिमित्त चाळीसगाव नगरपालिका (Chalisgaon Municipality) आवारात उभारण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वात उंच अशा ७५ फूट तिरंगा ध्वजारोहण चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहर वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नवीन प्रशासकीय इमारतीत नगरपरिषद स्थलांतर झाल्यानंतर सर्वप्रथमच याठिकाणी ऐतिहासिक असे ध्वजारोहण आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. नंतर त्यांनी मनोगतात सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे मी माझे भाग्य समजतो. चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.

यावेळी चाळीसगाव नगर परिषदेच्या अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रमास चाळीसगांव उपविभागीय अधिकारी लक्षमीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोबंरे, शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. के.पाटील यांच्यासह नगरसेवक नपा कर्मचारी तसेच पत्रकार बांधव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.