‘शिवनी’ विमानतळाच्या धावपट्टी विस्तारिकरणाचा प्रश्न लागणार मार्गी

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

अकोला-खंडवा या रखडलेल्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता शिवनी विमानतळाच्या (Shivni Airport) धावपट्टी विस्तारिकरणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. शिवनी विमानतळाची धावपट्टी अडीच हजार मीटरपर्यंत वाढविण्यासाठी आमदार वसंतजी खंडेलवाल (MLA Vasant Khandelwal) यांनी पुढाकार घेतला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी (Union Minister Nitinji Gadkari) आणि ना. व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत शिवनी विमानतळ धावपट्टी विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

वसंत खंडेलवाल यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, एकाच आठवड्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि अकोल्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यात. याच महिन्याच्या शेवटी या विषयावर पुन्हा दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून काही अतिरीक्त जमीन यासाठी हस्तांतरित करावयाची आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून यासंदर्भातील निर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या विषयावर मार्च महिन्यात आढावा बैठक बोलावली होती. हा प्रश्न तातडीने कसा मार्गी लावता येईल यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. बैठकीला आमदार खंडेलवाल यांच्यासह जिहाधिकारी निमा अरोरा आणि अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.