‘दोस्त हो तो मुकेश अंबानी जैसा’, मित्राला दिले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे घर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपले मित्र मनोज मोदी (Manoj Modi) यांना एक सुखद धक्का दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपले सर्वात जुने कर्मचारी मनोज मोदी यांना 1500 कोटी रुपयांचे घर गिफ्ट दिलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) प्रत्येक डीलमध्ये मनोज यांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे मनोज आणि मुकेश अंबानी एकत्रच शिकलेले आहे. मनोज मोदी यांना देण्यात आलेलं हे घर खरोखरच आलिशान आहे.

 

अंबानी कुटुंबाने मनोज मोदी यांच्यासाठी मुंबईतील पॉश वस्तीमध्ये 22 मजली इमारत खरेदी केली आहे. नेपियन्सी रोडवर ही आलिशान इमारत आहे. त्याला वृंदावन असं नाव देण्यात आलं आहे. ही 22 मजली इमारत 1.7 लाख वर्ग फूट क्षेत्रात पसरलेली आहे. या इमारतीची किंमत 1500 कोटी रुपये आहे. या घराची डिझाईन तलाटी अँड पार्टनर्स एलएलपीने केली आहे. घरातील काही फर्निचर इटलीहून मागवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.