ब्रेकिंग; छत्तीसगढ मधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 11 जवान शहीद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सध्या मोठी बातमी येत आहे. छत्तीसगढ (Chhattisgarh) मधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी (Naxalite attack) मोठा हल्ला केला असून नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. या शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी जवान आहेत, तर एक चालक आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.

 

या शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी (District Reserve Guard) जवान आहेत, तर एक चालक आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी आयडीचा स्फोट केला.

Leave A Reply

Your email address will not be published.