राष्ट्रवादीच्या शिबीर पत्रकातून अजित पवारांचे नाव वगळले ?

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शिबीर उद्या मुंबईत होत असून या शिबिराच्या पत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे. भाजप सोबत जाऊन अजित पवार बंडखोरी करतील अशा चर्चा राज्यात होत असताना आता त्यांचे नाव वगळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकात म्हटले आहे कि , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी 9.00 वा ते सायंकाळी ६.०० वा. या वेळेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘ध्येय राष्ट्रवादीचे… मुंबई विकासाचे…’ या शिर्षकाखाली ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीर २०२३ वे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर शिबीराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल. त्याचबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होईल.असे यात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.