हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात युवक जखमी

0

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क

एका हिंस्त्र प्राण्याने दीड वर्षाच्या बालकावर हल्ला करत त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता एका तरुणाने प्रतिकार केला लांडग्यासोबत (wild animal) झालेल्या झटापटीत तरूण जखमी (Youth injured in attack) झाला असून लांडगा ठार झाला आहे. जखमी तरूणावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

१७ एप्रिल रोजी दीड वर्षाच्या चिमुकला गोलु भिल आपल्या आई जवळ असतांना त्या ठीकाणी अचानक हिंस्त्र प्राणी लांडग्याने हल्ला केला. आईजवळ असलेले बाळ पळविले.हे लक्षात आल्यानंतर योगेश अनिल भिल (वय-२१) या युवकाने त्या बालकाची लांडग्याच्या तावडीतुन सुटका हिंस्त्र प्राण्याशी दोन हात केले. लांडग्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. यात लांडगा मारला गेला आहे. जखमी झालेल्या तरूणावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावलच्या पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर त्यांचे सहकारी व अभयरण्य विभागाच्या क्षेत्राचे चौहाण यांच्यासह उपास्थित होते. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी युवकाच्या उपचाराकरिता आर्थिक मदत केली .

Leave A Reply

Your email address will not be published.