अजित पवार यांना डेंग्यूची लागण, प्रफुल्ल पटेल यांनी पोस्ट करत दिली माहिती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना तोंड फुटले आहे. अजित पवार काल बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्याने अजित पवारांनी हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे.

याचदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अंकित पवार यांना काल डेंगू ची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, असे ट्विट राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट
अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याने प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या दिल्या जात आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे. त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मदत आणि विश्रांतीची गरज आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसर्वेच्या जबाबदाऱ्यांची कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, आधी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.