मुंबईच्या रस्त्यांवरून काली-पिली टॅक्सी होणार गायब !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी पद्मिनी टॅक्सी आता कायमची बंद होणार. मुंबई मध्ये खास काली-पिली या नावाने ओळख असलेली पद्मिनी टॅक्सी अधिकृतपणे चालवता येणार नाही. याबाबतची माहिती वरिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर आला काली-पिली ‘पद्मिनी टॅक्सी’सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरून गायब होणार आहे. नवे मॉडेल्स आणि अँपमुळे टॅक्सी कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नव्या मॉडेल्सच्या काली-पिली टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून धावतांना दिसणार आहे.

याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी’ २९ ऑक्टोबर २००३ रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झाली होती. तसेच या टॅक्सीचे उत्पादनही २००१ साली बंद करण्यात आले आहे.

मुंबईकरांच्या आयुष्यात होते मानाचे स्थान…
मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ६० वर्षांपासून ही पद्मिनी टॅक्सी दिमाखात धावत होती. ९०च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटांमध्येही या टॅक्सिने मानाचे स्थान मिळवले होते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई टॅक्सीमॅन संघटनेने किमान एक काली-पिली टॅक्सी जतन करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.