धार्मिक कार्यक्रमात मोठा स्फोट; २० जण जखमी, १ जणाचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

केरळमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात मोठा स्फोट झाल्याची भयानक घटना घडली आहे. एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका सभागृहत ख्रिश्चन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा सुरु असतांना या ठिकाणी अंगावर थरकाप उडविणारा स्फोट झाला. या भीषण स्फोटात एक जण दगावला असून, २० हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमका हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. केरळ पोलिसांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेले नाही. सकाळी स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांसह बचावकार्यास सुरुवात केली.

स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. दरम्यान एकापाठोपाठ एक ३-४ स्फोट झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

ही घटना असतीशत दुर्दैवी आहे. घटनेचा तपशील गोळा करत आहोत. सर्व उच्च अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. डीजीपी घटनास्थळी पोहोचत आहे. आम्ही प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी स्वत: डीजीपींशी बोललो आहे. तपासानंतर आम्हाला अधिक तपशील मिळतील, असं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.