जपून वागा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सावधानतेचा इशारा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडमध्ये आहे. रायगडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते विकासकामांच भूमिपूजन झालं. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. गाफील राहू नका. कुणी काही वक्तव्य करत तसं करू नका. जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे घेतात. आमची यावर व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखावून घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

निवडणुकीत स्लोगन काय ?
आगामी निवडणुकीत ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपलं स्लोगन आहे. आपण युतीत आलो आहेत. पक्ष वाढवायचा आहे. काम करताना विरोधात प्रश्न विचारून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे. लोकसभेत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आणून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहेत. लवकरच नमो मेळावे आपण घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
तुम्ही होम ग्राउंड सांभाळा..आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा. कुठे दगडफेक केली, कुठे शिवीगाळ केली असं आपण करू नका, गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी इथे आपली सीट आणायची आहे.आपण सर्व उमेदवार आहात, असा विचार करून काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.