शिवजन्मोत्सव सर्वांनी शांततेत साजरा करावा; डीवायएसपी नंदवाळकर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी दिनांक 19 रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.

जळगाव येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक 16 पारोळा पोलीस ठाणे या ठिकाणी आयोजित शिवजयंती निमित्त बैठकी प्रसंगी बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शांताराम पाटील शहराध्यक्ष महेश पाटील, शीतल अकॅडमीचे संचालक रवींद्र पाटील यांच्यासह शहरातील मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी नंदवाळकर म्हणाले की, “तालुक्यात आजवर अनेक सण, उत्सव, जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आहे. या प्रत्येक सोहळ्यात सर्वसण सर्वसमावेशकपणे साजरे करीत असतात. तसेच शिवजन्मोत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सर्व शिवप्रेमी यांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन देखील त्यावेळेस केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.