विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक भागात पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेला दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील काही भागांमधून थंडी गायब झाल्याचे चित्र दिसून येते, तर दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण व्यतिरिक्त राज्यात उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आज एक पश्चिमी प्रकोप हिमालयाकडे येत असल्याने किमान तापमानात पुढील दोन ते तीन दिवसात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आजपासून ते २० तारखेपर्यंत वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असल्याच हवामान खात्याने सांगितले तर २१ तारखेपर्यंत राज्यांमध्ये येणाऱ्या उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.