शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून ‘दांडपट्ट्याला’ राज्यशस्त्र म्हणून दर्जा मिळणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवर्सज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री ८ वाजता आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने आग्र्याच्या किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवर यांनी दिली आहे. यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.