उपमुख्यामंत्री अजित पवारांच्या हस्ते २ फेब्रुवारीला चोपडा येथे शंभर कोटींच्या सूतगिरणीचे उद्घाटन

0

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. चोपडा येथे शंभर कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार तसेच त्यांच्या – उपस्थित यावल येथे पक्षाचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. याबाबत माहिती देतांना पवार 1 यांनी सांगितले की, अमळनेर येथे होत .

असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटनासाठी २ फेब्रुवारी रोजी येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घनःश्याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.