नशिराबाद ,जामनेर येथे महिलांचा विनयभंग

0

जामनेर / नशिराबाद;- जिल्ह्यातील नशिराबाद आणि जामनेर शहरात वेगवेगळ्या घटनेत महिलांना लाज उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जामनेर येथिल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली. आहे .

तालुक्यातील नशिराबाद येथे एका महिलेच्या घरी जाऊन दरवाजा बंद करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नशिराबाद येथे एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षे महिलेला तिच्या घरी जाऊन आरोपी नामदेव फकीरा माळी रा. नशिराबाद याने महिलेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून घे असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल येईल असे कृत्य केल्याप्रकरणी पीडित महिलेने नशिराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून आरोपी नामदेव फकीरा माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

जामनेर येथे महिलेचा विनयभंग
जामनेर शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 28 वर्षे अभिवायतीला आरोपीने चोरून त्याच्या मोबाईलमध्ये महिलेच्या मागील बाजूचे व्हिडिओ शूटिंग करून पीडित महिलेच्या अंगाला स्पर्श करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी धर्मेश रामकुमार राजपूत आणि प्रवीण शिवराम आहेरकर दोन्ही रा. नाशिक यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.