अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी; बसच्या समस्येमुळे पर्यटकांची नाराजी

0

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. अजिंठा लेणीमध्ये हजारो देशी विदेशी पर्यटक पाहिला मिळत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे भारतीय पुरातत्व विभाग, एमटीडीसी, एसटी महामंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली. अजिंठा लेणी पाहिल्यानंतर पर्यटकांना घरी जाण्यासाठी बसजवळ लांबच लांब रांगा लागल्या असतात. लहान मुले, वृद्ध, महिला, पर्यटकांसह आलेल्या महिलांना बस आणि बस तिकिटासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागल्याने पर्यटक एसटी महामंडळावर संतापले.

पावसाचे आल्हाददायक वातावरण, डोंगरात हिरवीगार हिरवळ, त्यातच रिमझिम पाऊस, वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या निसर्गय वातावरणात पर्यटकांनी लेण्यांमध्ये संपूर्ण हंगामाचा आनंद लुटला. ज्यामध्ये कोणी आपल्या कुटुंबासोबत लेण्यांसमोर फोटो काढत आहे.  इतकंच नाही तर पर्यटक कुटुंबियांसोबत याचा आनंद लुटत आहेत.  दरवर्षी पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी असते, तर शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढते. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील प्रदूषण टाळण्यासाठी 2002 पासून खाजगी वाहनांना लेण्यांच्या आत जाण्यास बंदी आहे.  त्यामुळे शासनाच्या वतीने फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंत केवळ एसटी महामंडळाच्या बसेस चालवल्या जातात.

अजिंठा लेणीमध्ये सोयगाव आगरच्या बसेस चालवल्या जातात, मात्र कर्मचारी कमी असल्याने पर्यटकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. रविवारी अजिंठा लेणीत फक्त चार कंडक्टर होते, तर जास्त बसेस होत्या.  दहा बसेस चालवायच्या असतील तर अजिंठा लेणीत किमान सात कंडक्टर असावेत, असे पर्यटकांनी सांगितले. अजिंठा लेणीमध्ये पर्यटक गर्दीच्या वेळी बससाठी तासन् तास रांगेत उभे असतात. अजिंठा लेणीतील या बसेसच्या समस्येमुळे पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.